औंध येथे बंद स्विमिंग पूल मध्ये साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती

औंध : औंध परिसरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या बंद स्विमिंग पूल मध्ये साठलेल्या पावसाचे पाणी व झाडांमुळे मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढले आहे.

औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या मागे असलेल्या स्विमिंग पूल गेले अनेक वर्ष बंद अवस्थेत आहे. याची देखभाल घेतली जात नसल्यामुळे स्विमिंग पूल मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्यांमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने परिसरात डेंग्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.

स्विमिंग पूल रिकामा करण्यात यावा तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याअगोदर या परिसराची स्वच्छता करण्यात यावी तसेच डासांच्या उत्पत्ती रोखण्यासाठी फवारणी करण्यात यावी अशी मागणी मनसेचे छत्रपती शिवाजीनगर विभाग उपाध्यक्ष निलेश जुनवणे यांनी केली आहे.

See also  औंध, मॉडेल कॉलनी भागाच्या विकासासाठी सिद्धार्थ शिरोळे यांचा कायमच पुढाकार