साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांनी घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट

नागपूर : अमळनेर, जि. जळगांव येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि त्यांच्या पत्नी अरुणा शोभणे यांनी विधानभवनात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.

यादरम्यान उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शोभणे दाम्पत्याचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

See also  शासनाकडून दिंड्याना मिळणा-या २० हजार रुपये अनुदानाचे दिंडी प्रमुखांनी केले स्वागत