कात्रज : दिनांक १९.०४.२०२५ रोजी कात्रज येथील पेशवे तलावात सकाळच्या सुमारास एका युवतीने उडी घेतली असता जवळच असलेल्या नागरिक तसेच सुरक्षा रक्षकाच्या ओरडण्याच्या आवाजावरून कामावर निघालेले दशरथ तळेवाड यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारून तरुणीला सुखरूप बाहेर काढून तिचे प्राण वाचविले आहेत.
अनेकवेळा अपघात व दुर्घटना स्थळी नागरिक उपस्थित असताना मदतीसाठी न जाता व्हिडीओ काढणे , पळून जाणे असे प्रकार सरार्स घडत असतात. मात्र दशरथ तळेवाड यांच्यासारखे माणुसकी दाखविणाऱ्या देवदूताच्या धाडसाचे कौतुक सत्कार स्वरुपात कोंढवा येवलेवाडी कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री.लक्ष्मण कादबाने यांनी डॉ. दत्ता कोहिनकर यांचे शुभ हस्ते शाल , श्रीफळ व पर्यावरणपूरक झाडाचे रोप असलेली कुंडी मानचिन्ह , सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात डॉ. दत्ता कोहिनकर यांचे शुभ हस्ते श्री.दशरथ तळेवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. श्री.तळेवाड हे देवदूत असुन त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे तसेच रामतीर्थ , पु.ल.देशपांडे यांची उदा. देऊन समाजाप्रती प्रेम असलेले लोकांचा आपण आदर , सत्कार केला पाहिजे असे मा.डॉ.दत्ता कोहिनकर यांनी सांगून सहायक आयुक्त श्री. कादबाने यांचे श्री.तळेवाड यांचा सत्कार केला याकरिता आभार मानले.
सदर कार्यक्रम प्रसंगी मा.डॉ.दत्ता कोहिनकर वेळात वेळ काढून सत्कार सोहळ्यास उपस्थिती राहिल्याबद्दल शाल, श्रीफळ व पर्यावरणपूरक झाडाचे रोप असलेली कुंडी देवून त्यांचे आभार मानण्यात आले. सदरच्या कार्यक्रमास या कार्यालयाकडील उप अभियंता श्रीमती राखी चौधरी , प्रशासन अधिकारी श्री.सुनील मोरे , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री.राजू दुल्ल्म , श्री.जालिंदर कदम , यांचे सह सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.