इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे ( वेस्ट ) ची कार्यकारणी जाहीर

औंध – पुणे येथील नामांकित अशा इंडियन डेंटल असोसिएशन पुणे वेस्ट ची २०२४ ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली .
यामध्ये डॉ वैभव तोरडमल यांची अध्यक्षपदी ,डॉ. बालाजी सदाफुले यांची सचिव पदी ( दोन वर्षे), डॉ मोनिका दहीवलेकर यांची भावी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.


यावेळी असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. अजित कदम व सदस्य डॉ.योगेश पंडित, डॉ तुषार तरवटे डॉ. गणेश गरुड,डॉ. गौरांग पाटील, डॉ. हरीश सोनार , डॉ.प्रणव पाटील,डॉ.निकुंभ, डॉ.राकेश शालघर डॉ.विधी भानुशाली,डॉ.जयश्री महाजन,डॉ. प्रियांका सदफुले , डॉ.पल्लवी जाधव,व इतर सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम ‘सयाजी हॉटेल ‘ वाकड येथे आयोजित करण्यात आला होता. असोसिएशन च्या माजी महिला अध्यक्षा डॉ मिनल सपाटे यांनी नूतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मांजरी बु. येथील विविध विकासकामांची पाहणी