आम आदमी पक्षातर्फे १५१ खासदारांच्या निलंबनाच्या कृतीचा निषेध

पुणे : आम आदमी पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा सरकारने हेतू पुरस्कार केलेल्या १५१ खासदारांच्या निलंबनाचा ठिया आंदोलन करत तीव्र निषेध करण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी भाजप सरकारने विरोधी पक्षातील तब्बल १५१ खासदारांचे निलंबन केले. अशाप्रकारे केली गेलेली निलंबनाची कृती म्हणजे विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याची कृती असून आणीबाणीच्या काळात ज्या प्रकारे विरोधकांना त्रास देण्यात आला होता त्याच मार्गावर सध्याची भाजपा चालत असल्याचे आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद कीर्तन यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्ष हा हेतू पुरस्कर इतर विरोधी पक्षांचा आवाज दाबत आहे. आज पर्यंत भारतीय जनता पक्षाने शिवसेना राष्ट्रवादी सारखे पक्ष फोडले. आणि आता विरोधक संपवण्यासाठीच अशा प्रकारे निलंबनाचे अस्त्र वापरले जात असल्याचे मत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी व्यक्त केले.


लोकशाहीत सभागृहाचे कामकाज चालवण्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारवर असते परंतु सध्याचे भाजपा सरकार हे विरोधी पक्षांना निलंबित करून लोकशाहीची क्रूर चेष्टा करत आहे. लोकशाहीत सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षालाही तितकेच महत्त्व असते परंतु अशाप्रकारे सरकारकडून केली जाणारी कृती ही लोकशाही विरोधात असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाची यामुळे गळचेपी होत आहे. विरोधी पक्षातील खासदार हे देखील नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असतात त्यामुळे अशा प्रकारे निलंबन करण्याआधी सत्ताधारी पक्षाने अनेकदा विचार करण्याची गरज असते परंतु तसे न होता केवळ असूये पोटी भाजपाकडून विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम आदमी पक्षाकडून या आंदोलनात मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, सुरेखा भोसले, अक्षय शिंदे, सतीश यादव, ॲड.अमोल काळे, निलेश वांजळे, अमोल मोरे, संजय कोने, निरंजन आढागळे, ॲनी अनिश, अनिश वर्गीसे, सेंन्थिल अय्यर, प्रीती निकाळजे, ऋषिकेश मारणे, अल्ताफ शेख, शंकर थोरात, सचिन कोतवाल, रवी लाटे, निखिल खंदारे, अमित मस्के, मिलिंद सरोदे, अनिकेत सोनवणे, शिवराम ठोंबरे, मायकल मस्केरेनस, ॲड.गणेश थरकुडे, सागर बारगीर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  दिव्यांग विद्यापीठ स्थापनेचा अहवाल  समितीने तातडीने राज्य शासनाकडे  सादर करावा - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील