बालेवाडी : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार सौ. ज्योती नितीन चांदेरे यांनी बालेवाडी परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी घेत जोरदार प्रचार केला. यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या.
या प्रचार दौऱ्यात काँग्रेस पक्षाचे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार जीवन चाकणकर आणि संदीप बालवडकर यांनीही सहभाग घेतला. तिन्ही उमेदवारांनी एकत्रितपणे बालेवाडी परिसरातील विकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक व नागरी सुविधा यासंबंधी नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा केली.
नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी उमेदवारांकडून देण्यात आले. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर बालेवाडी परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, लक्ष्मी माता मंदिराजवळ सर्व उमेदवारांचे नागरिकांच्या वतीने भव्य आणि हार्दिक स्वागत करण्यात आले. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार दौऱ्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
























