पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दारिद्र्य रेषेखालील व गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत असून या घटकांतील नागरिकांनी https://beta.slasdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाने केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मार्फत मातंग समाज व तत्सम मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील नागरिकांसाठी मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघु ऋण वित्त योजना, शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येतात. या समाजातील गरजू नागरिकांनी विविध कर्ज योजनांचे लाभ घ्यावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे.