आशानगर येथील पाण्याच्या टाकीची पाहणी!लवकरच उद्घाटन होईल : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आशानगर येथे महापालिकेच्या २४ x ७ योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणीआमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी केली. यावेळी टेस्टिंग ट्रायलची कामे त्वरित पूर्ण करून देण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक गेली ४ वर्षे या पाण्याच्या टाकीच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. मला आनंद आहे की लवकरच या टाकीचे काम पूर्ण होणार असून याचे भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे,असे आ.शिरोळे यांनी पाहणी नंतर सांगितले.

या पाण्याच्या टाकीमुळे आशानगर, वैदूवाडी, चतुःश्रृंगी परिसर, पीएमसी कॉलनी, जनवाडी, जनता वसाहत, डिफेन्स कॉलनी, निलज्योती सोसायटी, म्हाडा कॉलनी भागातील नागरिकांना येत्या १० ते १५ दिवसांमध्ये पुरेशा दाबाने व दिवसा वेळेवर पाणी मिळेल, अशी माहिती आ.शिरोळे यांनी दिली.

त्याच प्रमाणे संपूर्ण गोखलेनगरला देखील पुरेशा दाबाने व वेळेवर पाणीपुरवठा होणार आहे. तसेच गोखलेनगर भागासाठी मॅफको येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरु असून त्याचा देखील सातत्याने पाठपुरावा सुरु आहे,असे आ.शिरोळे यांनी सांगितले.

यावेळी गणेश बगाडे, आदित्य माळवे,योगेश बाचल, सतीश बहिरट, किरण ओरसे, हेमंत डाबी, सुरेश शिंदे, विकास डाबी, रमेश भंडारी, आकाश बगाडे, गौतम लोखंडे, संतोष जगताप तसेच पुणे मनपा पाणीपुरवठा विभागाचे सबंधित अधिकारी उपस्थित होते.

See also  झोपेचे सोंग घेतलेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त जागे कधी होणार