औंध स्मशानभूमी सुधारणांसाठी ५० लाखांच्या कामांना प्रारंभ- आ. सिद्धार्थ शिरोळे

पुणे : आमदार स्थानिक विकास निधीतून औंध स्मशानभूमी सुधारणांसाठी५० लाख रु.उपलब्ध केले असून कामांना सुरुवात करण्यात आली आहे,अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

औंध स्मशानभुमी येथे पावसाळ्यामध्ये अंतिम संस्कार करण्यास बऱ्याच समस्या येतात . या समस्या दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. या निधीतून औंधगावासाठी एक चांगली समस्यामुक्त स्मशानभूमी होईल, असा विश्वास आ.शिरोळे यांनी व्यक्त केला.

या कामांची सुरुवात शुक्रवारी झाली.यावेळी बाळासाहेब रानवडे, आनंद छाजेड, सचिन वाडेकर, सचिन मानवतकर, सुप्रीम चोंधे,सागर मदने, गणेश कलापुरे, अभिषेक जेऊर, बंडू कदम, परशुराम भाऊ रानवडे, राजेंद्र खोले, शहाजी शिंदे, बाबासाहेब रानवडे, गणेश गायकवाड, विकास रानवडे, संजय कलापुरे, पेटकर काका, अॅड अमोल कलापुरे, अमरजित सिंग मान, हमीद पठाण, अल्लाउद्दीन पठाण, शिवाजी रानवडे, कवलजीत सिंग मान, सुर्यकांत कलापुरे, योगेश पवार, सुनील काची, रणजीत कलापुरे, नितीन रानवडे, बाबू भोर, राजू सावंत, राहुल गायकवाड, संतोष गुजर, रोहित भिसे तसेच औंधगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन