कोथरूड भागातील पाणी पुरवठा संदर्भात काँग्रेस पक्षाचे आंदोलन

पुणे : पुणे शहरातील कोथरूड भागातील भुसारी कॉलनी शास्त्री नगर बावधन जयभवानी नगर आझाद नगर गुजरात कॉलनी सुतार दरा केळे वाडी इतर अनेक भागात पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने पाणी सोडले जायचे त्यामुळे नागरिक अडचणी होत होत्या यासंदर्भात काँग्रेसच्या वतीने पुणे महापालिका वर आंदोलन करण्यात आले व पाणी पुरवठा पुणे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता नंदकिशोर जगताप यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र भाऊ धंगेकर माजी मंत्री रमेश बागवे ,वृक्ष संवर्धन समिती सदस्य द स पोळेकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे, चेतन आगरवाल इंटक अध्यक्ष बळीराम डोळे, राजीव गांधी पंचायत राज संघटन अध्यक्ष किशोर दादासाहेब मारणे, महीला कोंग्रेसचे सरचिटणीस स्वाती शिंदे, राजीव गांधी पंचायत राज संघटन उपाध्यक्ष मनीषा गायकवाड, दता जाधव, योगेश नायडु, कोथरूड उपाध्यक्ष हनुमंत गायकवाड, बंटी जाधव माणीक थोरात अंकुश आडसुळ विकी कांबळे लखन कुराडे सागर कमलाकर रामदास केदारी पुष्पा गोळे ज्योती जाधव रंजना पवार निता पाटोळे पुजा चव्हाण विश्वास खवळे अरुण नाईकनवरे संगीता कांबळे इत्यादी उपस्थित होते पुणे शहर राजीव गांधी पंचायत राज संघटन अध्यक्ष किशोर मारणे उपस्थित होते.

या आंदोलनाचे आयोजन किशोर मारणे अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन यांनी केले होते. या वेळी पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता नंदकिशोर जगताप यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले उद्या पासून पाणी पुरवठा सुरळीत करण्यांत यावा संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वर्धापन दिनाची केडगाव अहमदनगर येथील सभा रद्द