पाषाण येथील शिवनगर, विठ्ठल नगर, लमाण वस्ती येथील नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ

पाषाण : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, व कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या विकास निधीतून पाषाण सुतारवाडी येथील शिवनगर, विठ्ठल नगर, व लमान वस्ती भागातील ड्रेनेज लाईन च्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

वस्ती विभागातील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन पुणे शहर भाजपा चिटणीस राहुल कोकाटे यांच्यामार्फत स्थानिक आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या विकास निधीतून जवळपास सव्वाशे कोटी रुपयांच्या नवीन ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील मान्यवर ह भ प श्री विठ्ठल आण्णा सुतार, ह भ प श्री दिलीप रणपिसे, श्री गोविंद तात्या रणपिसे, श्री परमेश्वर सुतार, श्री संतोष तोंडे, श्री सतीश पुंड, श्री शंकर सुर्वे, श्री संजय जगताप, श्री अशोक माकर, श्री दत्ता लकडे, श्री बालाजी, श्री उत्तम जाधव, कल्याणी टोकेकर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सदर ड्रेनेज लाईन च्या कामाचा पाठपुरावा पुणे शहर भाजपा चिटणीस श्री राहुल कोकाटे, स्वीकृत नगरसेवक श्री शिवम सुतार, व महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ स्नेहल सुतार यांनी केला.

See also  चांदणी चौक रंगाला सजला पण बसथांबा उन्हातला?