बाणेर : योगीराज पतसंस्थेच्या वतीने मोनाली नायकरे या पदवी प्राप्त अंध मुलीच्या लग्नासाठी योगीराज कन्यारत्न विवाह मदत योजने अंतर्गत संपूर्ण भांड्यांचा संसार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, उपाध्यक्ष राजेश विधाते व उद्योजक संतोष डफळ यांच्या शुभहस्ते भेट देण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, योगीराज पतसंस्थेच्या वतीने “योगीराज कन्यारत्न विवाह मदत योजने” अंतर्गत आज पर्यंत पुणे जिल्हयातील 122 गरीब मुलींना संपूर्ण भांड्यांचे संसार भेट देण्यात आले आहेत. परंतू पहिल्यांदाच एका अंध व पितृछत्र हरवलेल्या गरीब मुलीला कन्यादान करताना जास्त आनंद झाला आहे. डॉ.सिंधूताई सपकाळ यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून आम्ही संस्थेच्या माध्यमातून हे कार्य करत आहोत. तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने अशा प्रकारची विवीध प्रकारे गरीबांना मदत केली जाते. तसेच संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख यावेळी सादर केला.
याप्रसंगी अॅड. गीतांजली वाडणे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, सभासद शशिकांत पारखे, सर्व स्टाफ व खातेदार उपस्थित होते.
























