वाघेश्वरी माध्यमिक विद्यालयात चप्पल वाटपाचा कार्यक्रम साजरा.

पुणे : वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय , पिंगोरी या विद्यालयात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सोमनाथजी कणसे यांच्यावतीने मोफत चप्पल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरूवात संस्थापक अध्यक्ष स्व.चंदुकाका जगताप व विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शांताराम राणे यांनी विद्यालयाची स्थापना ते आजपर्यंतच्या गुणवत्तेचाआढावा दिला. तसेच सोमनाथ कणसे,संतोष जगताप यांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे आवशयकतेनुसार मदत केली जाईल असे आपल्या मनोगतातून आश्वासन दिले.

यावेळी सोमनाथजी कणसे आदर्श सरपंच जवळार्जुन , मा.संतोष जगताप, अध्यक्ष स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान,सासवड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंटी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शिंदे, ॲड. ओंकार टेकवडे ,धनंजय कणसे, सहशिक्षक भावराव ठाकरे,संदीप कांबळे,सहशिक्षिका विद्या जगताप,रुपाली जगताप,शिक्षकेतर हेमंत भोसले,सागर भगत व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्र संचलन गौरी भोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शोभा चव्हाण यांनी केले.

See also  पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या--महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील