बालेवाडीत बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी नामांकित  बांधकाम व्यावसायिकास दंड करण्यास टाळाटाळ

बालेवाडी : बालेवाडी येथील सर्वे नं 45 या ठिकाणी कस्तुरी स्पेसेस या बांधकामाच्या STP साठी 1060 ब्रास बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहे.तलाठी यांनी सदर जागेची पाहणी केली असता.त्या ठिकाणी दोन पोकलेन आणि 3 हायवा डंपर वाहतुक करत होते.सदर जागेचा पंचनामा होऊन दोन आठवडे झाले तरी दंड केला जात नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.बांधकाम व्यावसायिकाने शासनाच्या महसूल विभागाची कसलीही परवानगी न घेता सदर व्यावसायिकाने सुमारे 1030 ब्रास गौणखनिजाचे उत्खनन करत बांधकाम सुरु केले आहे.दोन आठवड्यापूर्वी सदर उत्खननाचा पंचनामा केल्यानंतरही अजून उत्खननाचे काम निरंतर सुरु असल्याने आहे.


सदर बांधकाम व्यावसायिकाचे चालू असलेले अनधिकृत गौण खनिज उत्खनन थांबवावे.पोकलेन, हायवा जप्त करण्यात यावे आणि बांधकाम व्यावसायिकास दंड करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

See also  कोथरूड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखांचे आमदार सचिन आहेर यांच्या हस्ते उद्घाटन