मुळशी : मुळशी तालुक्यातील नांदे गावातील शेतकरी कुटुंबातील आदर्श माता कौशल्याबाई शंकरराव रानवडे ( वय 90 वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा दोन मुली, सुना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा किसन रानवडे एका अपघातात मृत्यू पावला तर दुसरा मुलगा नांदे गावचे माजी उपसरपंच सुभाषआबा रानवडे हे दोन वर्षापूर्वी कोविडमध्ये अल्पशा आजाराने मृत्यू पावले. दोन्ही मुलांच्या व पतीच्या मृत्यूने त्या खचलेल्या कौशल्याबाईनी अखेर वयाच्या 90व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटूंब पद्धतीचा वसा वारसा जोपासत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काबाड कष्ट करून त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ सेवकांच्या पतसंस्थेचे चेअरमन अशोक रानवडे यांच्या त्या मातोश्री तर नांदे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अनिकेत रानवडे यांच्या आजी तर सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे बापूसाहेब पारखी यांच्या त्या भगिनी होत.