भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेरच्या नवीन कार्यकारिणी निवड

बाणेर : बाणेर येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या सन 2024 ते 2027 साठीच्या विश्वस्त कार्यकारिणी मंडळाची निवडणूक ट्रस्टच्या परंपरेनुसार यावेळीही बिनविरोध पार पडली.

दिनांक 27/01/24 रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवडून आलेल्या विश्वस्त मंडळास मान्यता देण्यात आली व नवीन विश्वस्त मंडळापैकी श्री राहूल कृष्णाजी पारखे यांची उपाध्यक्षपदी, श्री. अनिकेत बाळासाहेब मुरकुटे यांची सचिवपदी, सौ.वर्षा राजेश विधाते यांची खजिनदार पदी विश्वस्त मंडळातील बहुमताने निवड करण्यात आली. तसेच श्री.मंगेश पुंडलिक मुरकुटे यांची हिशोब तपासनीस पदी बिनविरोध निवड करण्यात आली. सन 2024-27 या कालावधीसाठी वरील पदाधिकारी व तसेच श्री. ज्ञानेश्वर केशवराव तापकीर, श्री. दिलीप बबनराव मुरकुटे, श्री. लक्ष्मण सोपानराव सायकर, श्री. प्रविण विलास शिंदे, सौ. सुभद्रा शशिकांत पारखे, सौ. सुनिता सोमनाथ तापकीर आदींची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली. यावेळी जुन्या कार्यकारणीचे आभार मानण्यात आले व तसेच मान्यवरांच्या हस्ते नवीन विश्वस्त मंडळाचा स्वागत सत्कार करण्यात आला. श्री. प्रविण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सदर वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

राहुल पारखे म्हणाले, श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदाची निवड व पदाधिकारी नेमणूक रितसर ट्रस्टच्या घटनेनुसार नियमाला धरून झाली असून आमचे काही विश्वस्त पद न मिळाल्यामुळे नाराज जरी असले तरी ते आमचेच सहकारी आहेत. कालांतराने त्यांचा राग शांत झाल्यावर ते आमच्या सोबत श्री भैरवनाथ मंदिर जिर्णोद्धार साठी एकत्र येतील याचा आम्हाला विश्वास व खात्री आहे. समस्त ग्रामस्थांना विश्वासात व सोबत घेऊनच भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार करणे व पारंपरिक देवाचे सर्व उत्सव ग्रामस्थांना बरोबर घेऊन करणे हेच आमचे ध्येय आहे

See also  सोमेश्वरवाडी येथे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान