बाणेर मध्ये अवैध गौण खनिज खोदकाम कारवाई बाबत तहसीलदार कार्यालयाची उदासीनता

बाणेर : गौण खनिजाची चोरी होत असताना पोलिसांनी तक्रार दाखल करण्याचे आदेश देऊ नाही तहसीलदार कार्यालय मात्र बघायची भूमिका घेत असून बाणेर परिसरातील जाऊन खनिजाची चोरीसाठी नकळत प्रोत्साहन दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

बाणेर येथील सर्वे नंबर 73 येथील तेज इलेव्हिया प्रोजेक्टसाठी खोदकाम करण्यात आले होते. 1225 ब्रास खोदकामाची परवानगी घेऊन प्रत्यक्षात 2442 ब्रास इतकी खोदाई करण्यात आली. याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर मंडल अधिकारी यांच्याकडून दिनांक 1/02/2023 रोजी पंचनामा करण्यात आला. यानंतर वारंवार तक्रारी करून देखील सदर कामावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही.

सदर बाब तुकाराम कळमकर यांनी जिल्हाधिकारी खनिकर्म अधिकारी यांना देखील कळवल्यानंतर कारवाई संदर्भात पत्र व्यवहार पूर्ण करण्यात आला. आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर चतुर्श्रुंगी पोलिसांनी आदेश दिले व गौण खनिज चोरी संदर्भात तहसीलदारांना तक्रार दाखल करावी असे पत्राद्वारे 18/8/23 रोजी कळवले.

यानंतर आठ महिने होऊन देखील तहसीलदार कार्यालयाकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही तसेच दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली नाही. सदर प्रकरणांमध्ये आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचे देखील तुकाराम कळमकर यांनी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री सचिव कार्यालयाकडे तक्रार दाखल करूनही त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

तहसीलदार कार्यालयाच्या उदासीनतेमुळे दिवसा ढवळ्या गौण खनिजावर दरोडा टाकला जात असून शासनाचा कोट्यावधी रुपयांचे महसूल देखील बुडवला जात आहे.यासंदर्भात तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहे.

See also  भारताचा अभिमान सन्मान २०२३ हा प्रेरणादायी पुरस्कार- डाॅ नंदुभाऊ एकबोटे