टापरेवाडी भोर येथे गुळ महोत्सवाच्या आयोजन, शेतकऱ्यांना गूळ बनवण्याचे प्रात्यक्षिक पाहता येणार

पुणे : गूळ हा एक उसापासून बनविला जाणारा नैसर्गिक गोड पदार्थ आहे. साखरेपेक्षा ही आरोग्यदायी मानला जाणाऱ्या गुळाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. यामध्ये ही गो आधारित नैसर्गिक गुळाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने गुळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी रंगनाथ टापरे म्हणाले की, “गो आधारित नैसर्गिक गुळ तयार करण्यासाठी ऊस सुद्धा नैसर्गिक पद्धतीने ऊस पिकवणे गरजेचे आहे, या महोत्सवात गुळ तयार करण्याची प्रक्रिया तसेच उसापासून कोणकोणते वेगवेगळे पदार्थ बनवले जातात याविषयीची माहिती उपस्थिती लोकांना देण्यात येईल” असे ही रंगनाथ टापरे म्हणाले. या गुळ महोत्सवाचे उद्घाटन गुरुवर्य मोहन महाराज मोरे, व पचंगव्य चिकित्सक संतोष कदम यांच्या हस्ते करण्यात येईल.

सदर गुळ महोत्सव भोर तालुक्यातील पुणे- सातारा महामार्गावरून १० किमी अंतरावर असलेल्या टापरेवाडी या गावामध्ये ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंगेश ज्ञानोबा टापरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क मंगेश ज्ञानोबा टापरे यांच्याशी संपर्क करावा -९८८१७३२२४६.असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  जी२० सदस्यांनी घेतला कोकणातील हापूस आंब्याचा आस्वाद; परिषदेच्या ठिकाणी प्रक्रियाकृत भरडधान्य उत्पादनांचेही प्रदर्शन