‘खारीचा वाटा’ महिलादिनाच्या निमित्ताने ARC Social औंधमध्ये  कार्यक्रम

औंध : चिंतामणी नगर, आनंदपार्क, औंधमधील ARC Social (पुणे मराठी ग्रंथालय, औंध शाखा) हे एक मराठी व इंग्रजी भाषेतील लहानथोरांसाठीचे  ग्रंथालय आणि प्रत्येकामधील सुप्त कलाकाराला संधी देणारे दालन आहे. जागतिक महिला दिनानिमित्त येथे ‘खारीचा वाटा’ हा उपक्रम आयोजित केला होता.
सौ. शोभा शेट्टीवार गेली २५ वर्षे सातत्याने आपल्या लेखणीद्वारे व्यक्त होत आहेत. त्यांच्या कवितांच्या पुस्तकांची व विविध उपक्रमांची तोंडओळख उपस्थितांना इथे झाली.


सीमा उपळेकर गेली ४० वर्षे सामाजिक कार्य करीत आहेत. त्यातील १९ वर्षे त्या जिनिव्हा मध्ये राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत होत्या. या उपक्रमाद्वारे त्यांनी आपले अनुभव कथन करणारे पुस्तक व मानसिक आरोग्यावरील अनुवादित पुस्तक उपस्थितांपर्यंत पोहोचवले.
अनुवादक-लेखिका सुषमा शाळिग्राम यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व सर्व उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधला.
‘प्रत्येकाकडे देण्यासारखे काहीतरी असते तसेच प्रत्येकाकडून शिकण्यासारखेही काही ना काही सापडते’ असे सांगून आपल्यातील कौशल्याला वाव देण्याचे त्यांनी सर्व महिलांना आवाहन केले. त्यासाठी स्थानिक स्तरावरील असे छोटे छोटे उपक्रम उपयुक्त ठरतील असे मत त्यांनी मांडले.


शोभा शेट्टीवार आणि सीमा उपळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी ARC Social आणि औंध वाङ्मय मंडळाचे  सभासद उपस्थित होते. उपस्थितांमधे सुजाता लिमये, रेखा मसुरकर, विजया पाटील, मृणालिनी जाधव, संगीता पाटील, मेधा हिरे,  मंगल राजोपाध्याय, अनुराधा पाटील, मीना पटर्वधन, आरती जुवेकर, रंजना काळे, सुजाता रिसबूड होत्या.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला. सुजाता लिमये यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.

See also  भाजपाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान