सुतारवाडी पाषाण कै.मारुती महादू सुतार विद्यालय इमारत उदघाटन व नामकरण समारंभ गुरुवारी

सुतारवाडी : कै.मारुती महादू सुतार विद्यालय इमारत उदघाटन व नामकरण समारंभ गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजता महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.मुरलीधर मोहोळ ,माजी महापौर पुणे मनपा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री मा.शशिकांतभाऊ सुतार, माजी उपमहापौर दिलीप बराटे, संस्कार मंदिर संस्था कार्यकारी संचालक आबासाहेब सुतार, माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार व इतर सांप्रदायिक , राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे .

तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉ. पंकज महाराज गावडे यांचे सुश्राव्य कीर्तन रामेश्वर महादेव मंदिर सुतारवाडी तलावाजवळ पाषाण पुणे 21 या ठिकाणी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत आयोजित केले आहे . या दोन्ही कार्यक्रमांना आपण उपस्थित राहण्याचे आवाहन आबासाहेब सुतार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ भरणार