, बालेवाडी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या निम्मिताने बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शक्ती आणि भक्ती या विषयावर ह. भ. प उदय महाराज घोडके यांचे व्याख्यान झाले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये बालेवाडी परिसरात राहत असलेल्या आणि समाजमध्ये बदल घडवण्यासाठी काही वेगळ काम करणाऱ्या मान्यवरांना BWF सिटिझन्स अवॉर्ड २०२४ या पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून या वर्षीचा पुरस्कार शामसुंदर कुलकर्णी,पत्रकार शीतल बर्गे, प्रशांत सरदेसाई आणि अश्विनी मुदये याना प्रदान करण्यात आला. शिक्षण, जनजागृती, नागरी समस्या, आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात काम असलेले हे पुरस्कारार्थी आहेत. बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन चे अध्यक्ष रमेश रोकडे, उपाध्यक्ष परशुराम तारे, अशोक नवाल, ॲडव्होकेट एस. ओ. माशाळकर आणि उदय महाराज घोडके यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. BWF सिटीझन अवॊर्डस चे समन्वयक आणि फेडरेशन चे संचालक अमेय जगताप यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली व भविष्यात फेडरेशन या पुरस्कार्थींच्या बरोबर ते करत असलेल्या काम मध्ये महत्वाचे योगदान देईल असे सांगितले. मोरेश्वर बालवाडकर यांनी प्रास्ताविक केले व फेडरेशन च्या कामाची माहिती दिली. अस्मिता करंदीकर यांनी सूत्रसंचलन केले तर यश चौधरी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला डी. डी. सिंग, विकास कामात, जीवन चाकणकर, पांडुरंग भुजबळ, दत्ताजी बर्गे, शकील सलाती, सचिन पाटील, राजीव शाह, डॉ. सुधीर निखारे, शुभांगी इंगवले, सुकुमार अय्यर, तसेच अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी, पुणे महिला मंडळाच्या सदस्य , नवचैतन्य जेष्ठ नागरिक संघाचे बालेवाडीतील सदस्य, वसुंधरा अभियान बाणेर चे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.