रात्रीच्यावेळी होणाऱ्या बांधकामा विरोधात कडक भूमिका घ्या -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – शहरात रात्री बेरात्री बांधकामे सुरू असल्यामुळे नागरिकांना त्रास होतो, त्या विरोधात पोलीस खात्याने कडक भूमिका घ्यावी, अशा मागणीचे निवेदन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना  (बुधवारी) दिले.

शहरात रात्री बेरात्री बांधकामे सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याचा त्रास आजुबाजूच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांची तक्रार आहे की बांधकामें रात्री उशीरापर्यंत चालतात, त्या मध्ये खोदकाम, मोठाल्या वाहनातून मालाचे लोंडिंग, अनलोडींग करणे, सिमेंट कॉंक्रिट मिक्सर चालवणे इत्यादी कामांचा आवाज आणि प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होतो. ह्यात जेष्ठ नागरिक आणि शालेय मुलांवर जास्त परिणाम होतो. वारंवार सूचना देऊन आणि तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही  होत नाही. पोलिसात तक्रार केली तर किरकोळ कार्यवाही होते आणि थोड्या दिवसात त्रास परत चालू होतो, असे आमदार शिरोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

रात्री बेरात्री होणाऱ्या बांधकामांचा त्रास टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे आणि कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली आहे.

See also  काँग्रेस संघटनेचे  तळागाळापर्यंत काम - नाना पटोले