बाणेर : भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सायरोबो हे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. बाणेर येथील आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन भरविले यावेळी खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक श्री शिवलाल धनकुडे, एडवोकेट दिलीप शेलार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपले गुण कौशल्य वापरून विज्ञान विषयावर वर विविध प्रयोगांचे सादरीकरण केले मुख्य आकर्षण म्हणजे अंध व्यक्तींना चालताना येणाऱ्या अडथळा यावर उपाययोजना तसेच गाडी चालवत असताना जर झोप येत असेल तर सायरन वाजणारा चष्मा सोलर एनर्जी विंड एनर्जी सुधारित शेती व्यवसायावर चालवण्याकरता वेगवेगळी यंत्रसामुग्री कशी वापरता येईल त्याचप्रमाणे पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती असते अशावेळी वेगळ्या पद्धतीचा पूल तयार करण्यात आला होता याच प्रमाणे विविध प्रकारचे प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे रोबोटिक्स च्या माध्यमातून छोट्या मुलांनी प्रयोग सादर केले.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, सर्व समस्यांचे उत्तर विज्ञानात शोधता येते विद्यार्थ्यांनी विज्ञानामार्फत वेगवेगळे संशोधन करावे व देशाच्या प्रगतीस हातभार लावावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच सिद्धार्थ रणवरे, पिरंगुट चे पोलीस पाटील महेश आल्हाट, पिरंगुट आरपीआयचे अध्यक्ष राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.