रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धनगर यांच्या प्रचारार्थ आम आदमी पार्टी, पुणे शहर आणि इंडिया फ्रंट पुणे शहर भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.

यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले,देशात लोकशाहीवर प्रहार होत असताना देशातील सुज्ञ जनता भाजपला सत्तेपासून पायउतार केल्याशिवाय शांत बसणार नाही, हा आम्हाला विश्वास वाटतो.
आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली जेल देखील दडपशाहीचाच भाग असून आम्ही सर्वजण या हुकूमशाहीचा व दडपशाहीचा निषेध करतो.

देशात ईडीसारख्या सरकारी यंत्रणा हाताशी धरून देशभरात दडपशाही आणि हुकूमशाही चालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला बळी न पडणाऱ्या आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना लोकशाहीवरती विश्वास आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तो विश्वास जनताच सार्थ ठरवेल, अशी खात्री आहे.

यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, सामाजिक कार्यकर्ते, निर्भय बनो डॉ. विश्वंभर चौधरी त्याचबरोबर इंडिया फ्रंट पुणे शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  बँड पथकातील शिस्तबद्ध कवायतीतून शालेय जीवनात शिस्तीला चालना- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर