महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पुणे पोलिस आयुक्तांचा सन्मान

पुणे :  शहराच्या कायदा, सुव्यवस्थेला आव्हान देणारे आणि शहराची शांतता भंग करणार्या कोणाचीही गय केली जाणार नाही. बेकायदा कृत्ये निदर्शनास येताच जागरूक नागरिक, युवक, सामाजिक कार्यकत्यांनी तत्काळ माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.      

शहराला ड्रग्ज, अवैध धंदे व गुन्हेगारांपासून मुक्त करून शहरात कायदा, सूव्यवस्था व शांतता कायम राखण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तपदी नियुक्त झाल्या क्षणापासून कार्यरत  असणारे अमितेश कुमार यांनी  गुन्हेगारांची परेड घेतली. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा जप्त केला. अवैध धंद्यांवर धडक कारवाई केली या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस गड किल्ले संवर्धन सेलतर्फे  सन्मान करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची सार्थ गाथा भेट देण्यात आली. तसेच गड किल्ले संवर्धन सेलच्या कार्याची माहिती देण्यात आली. ऐतिहासिक वारसा जपण्याचे गड संवर्धन सेलचे काम दिशा देणारे  आहे, या कामात मोठ्या संखेने युवकांना सहभागी करून घ्यावे असा सल्ला आयुक्तांनी या निमित्ताने दिला. नवीन पिढी उध्वस्त करणारे अवैध धंदे व हुक्का पार्लर वर  धडक कारवाई सुरू केल्याबद्दल पुणे शहराच्या वतीने प्रदेशाध्यक्ष  योगेश  शेलार यांनी आयुक्तांचे आभार मानले तसेच पुणे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला सुरक्षितता आणि उपाययोजना बाबत सविस्तर चर्चा करतानाच पुणेकरांनी सतर्कता बाळगून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. यावेळी  गड  किल्ले संवर्धनचे  मनोजकुमार भोसले , युवराज मुजुमले , कुणाल शेलार यांची उपस्थिती होती.

See also  गौरी सजावट स्पर्धेचा अभूतपूर्व प्रतिसाद आनंददायी! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन