एकता महिला ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त महिलांची एकदिवसीय सहल व सन्मान

बाणेर : बाणेर येथील एकता महिला ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त महिलांची एकदिवसीय सहल काढून कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

महिलांना त्यांचा स्वतःचा एक दिवस जगता यावा म्हणून बाहेर केला, जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसतं राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही तर स्वतःच्या समाधानासाठी “आनंदाने” जगणे म्हणजे आयुष्य या कल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात कर्तृत्वान महिलांबरोबर, गृहिणी तसेच उद्योग करणाऱ्या महिलांचा , शिक्षिका, सरकारी नोकरीं बयूटीशियन, यांचा पण सन्मान करण्यात आला.  सर्वाना फेटे बांधून ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये लकी ड्रा काढण्यात आले. नेत्रा नागपुरे, संध्या शेंडगे, रुपाली जाखळेकर, समिधा कदम, सारिका दानवे, विद्या जाधव, श्यामल भोसले,गिफ्ट्स पार्टनर होत्या त्यांनी महिलांना  गिफ्ट्स दिले. महिलांनी कार्यक्रम मध्ये डान्स करून एन्जॉय केले. 

विशेष वैशाली वाडकर,संध्या शेंडगे यांनी या सन्मान सोहळा आयोजन केले होते. यावेळी ४४ महिलांनी यात सहभाग घेतला.

See also  कोथरूड मतदारसंघातील ३५ कोटीच्या कामांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन