जागतिक महिला दीना निमित्त ” बिटिया फौंडेशन व झाशीची राणी प्रतिष्ठान ” च्या वतीने कर्तृत्वान यशस्वी महिलांचा सन्मान

पुणे : जागतिक महिला दीना निमित्त ” बिटिया फौंडेशन व झाशीची राणी प्रतिष्ठान ”  च्या वतीने कर्तृत्वान यशस्वी महिलांचा सन्मान पत्रकार भवन येथे संपन्न झाला. या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. जयश्री फिरोदिया ( उद्योजिका ) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

या प्रसंगी   ” सेवाव्रत पुरस्कार ”  डॉ. जयश्री फिरोदिया  यांच्या हस्ते मधुरा बाचल ( शेफ, मधुरा रेसिपी ), स्मार्तना पाटील ( पोलीस अधीकारी ), वृषाली दाभोलकर ( सामाजिक क्षेत्र ), मधुवर वेलणकर ( अभीनेत्री ), संगीता  ललवाणी ( उद्योजिका गोल्ड मार्ट ), डॉ. मनीषा नाईक ( पुणे म.न पा. आरोग्य विभाग ), पूनम ठाकरे ( फॅशन डिझाईनर ), डॉ. कविता मुरुगकर ( आर्किटेक्ट ), अश्विनी जाधव ( पत्रकार ), ऍड. लीना पाठक ( पब्लिक प्रॉसिक्युटर ), अंकिता नराळे ( ऍथलिट गोल्ड मेडलिस्ट ) या ९ महिलांना सन्मानित करण्यात आले. 


तसेच ” विशेष पुरस्कार ”  रुपी पौर्णिमा पवार ( अध्यक्ष, देवस्थान पहिली महिला ), तबस्सुम शेख ( प्रिन्सिपॉल, प्रेसिडेंट आर. के. फौंडेशन ), श्रद्धा सुर्वे ( महिला उद्योजिका ), या ३ महिलांचा  डॉ. जयश्री फिरोदिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी बिटिया फौंडेशन च्या अध्यक्षा संगीता  तिवारी व झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी सर्व महिलांचे स्वागत करूंन आपले  मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी अभिनेत्री मधुरा वेलणकर  यांनी आपल्या भाषणात मधुरम कार्यक्रमाची माहिती सांगताना मराठी भाषेत बोलावे, मराठी ही आपली भाषा असून एकमेकांशी मराठी भाषेतच संभाषण केले पाहिजे.
मधुरा बाचल यांनी मधुर रेसिपी बाबत माहिती सांगताना इतर भाषा मध्ये रेसिपी उपलध असते परंतु मराठी भाषे मध्ये उपलब्ध नव्हती, हा प्रयत्न मराठी भाषेत कोणीच केला नाही म्हणून मी मराठी भाषेत रेसिपी देणे सुरु केले. यामुळे मराठी भाषा आपली असून ते सहज रित्या  समजले पाहिजे.
पुण्यातील गोल्ड व्यवसायातील एकमेव महिला उद्योजिका संगीता  ललवाणी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले,महिलांनी सोन्याचे महत्व ओळखले पाहिजे. कोणते सोने कसे घ्यावे, सोने कसे खरेदी करावे व कसे विकावे  या विषयी  माहिती दिली, आणि महिलांसाठी मी म्हणेल त्याठिकाणी येऊन सर्वांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करीन.
प्रमुख पाहुणे डॉ. जयश्री फिरोदिया यांनी आपले  विचार व्यक्त करताना म्हणाल्या, महिलांनी आपल्या करियर बरोबर आपली प्रकृती, आपला परिवार सांभाळला पाहिजे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम, चांगले आहार घेऊन स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे. 
या प्रसंगी अभय  छाजेड, रफिक शेख, रमेश अय्यर, अक्षय  जैन, सुजाता शेट्टी, गौरी ढोलेपाटील 
व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले तर सर्वांचे आभार वैशाली पाटील यांनी मानले. सर्व महिलांना माहेरची साड़ी  देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 

See also  बाणेर मध्ये सिंधुदुर्ग राजकोट येथील महाराजांच्या पुतळ्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन