पीआयसीटी महाविद्यालयात “इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आणि शाश्वतता” विषयावर आंतरराष्ट्रीय सत्राचे यशस्वी आयोजन

पुणे :पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT),JCAME आणि IEEE पीआयसीटी AP-S विद्यार्थी शाखा  यांच्या संयुक्त विद्यमाने “इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आणि शाश्वतता” या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. IEEE अँटेना आणि प्रोपोगेशन सोसायटीच्या (AP-S) 75व्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच हा कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागात पार पडला.


कार्यक्रमात नामांकित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये डॉ. वेंग चो च्यू (पर्ड्यू विद्यापीठ), डॉ. अजय पोद्दार (सिनर्जी मायक्रोवेव्ह, USA), प्रा. जी. एस. मणी (IEEE JCAME पुणे अध्यक्ष), प्रा. यहिया अंतर (कॅनडा), डॉ. मुरलीधरन (अॅडव्हान्सड सिस्टिम्स), आणि डॉ. पुनीतकुमार मिश्रा (ISRO) यांचा समावेश होता. तज्ज्ञांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समधील तंत्रज्ञान आणि शाश्वततेसाठी त्याचा महत्त्वपूर्ण वापर यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वाय. रविंदर आणि डॉ. एम. व्ही. मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी  आणि प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे  यांचा कार्यक्रमासाठी मोलाचा पाठिंबा मिळाला.


विशेषतः, वंचित विद्यार्थ्यांसाठी “डू-इट-युअरसेल्फ” किट्स वापरून इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सवरील सत्र आयोजित करण्यात आले. तसेच, IEEE ने “ME and Electromagnetics” नावाची प्रयोगशाळा सुरू केली. PICT च्या स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे कौतुक झाले.
हा कार्यक्रम शाश्वत तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि सहयोग वाढवण्याच्या दिशेने यशस्वी ठरला.

See also  पुणे विद्यापीठ परीसरात रा. स्व. संघाचे पथ संचलन