मराठा समाजातील तरुणांनी न्यूनगंड सोडावा आणि प्रगती करावी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण अडसूळ यांचे आवाहन

पुणे : मराठा समाजातील तरुणांनी चांगली प्रगती करायची असेल तर स्वतः च्या मनातील न्यूनगंड काढून टाकला पाहिजे असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण अडसूळ यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले.


अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शनिवारी सकाळी पद्मावतीजवळ आण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित केलेल्या आजचा निश्चय, पुढचं पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन डॉ अडसूळ यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते आपल्या भाषणात बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मगरपट्टा टाऊनशिप डेव्हलपर, अँड कन्स्ट्र लिमिटेड या कपंनीचे प्रमुख सतीश मगर, कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, के एज्युकेशनल संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव जाधव, बांधकाम व्यावसायिक अरुण निम्हणं, माजी नगरसेवक शाम मानकर, हॉटेल व्यावसायिक जवाहर चोरगे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आदी मान्यवर उपस्थित होते.


डॉ अडसूळ आपल्या भाषणात म्हणाले कि, मराठी तरुणांना स्वतः ला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागतो एम पी सी व यू पी एस सी परीक्षा देताना त्यांनी इतर क्षेत्रातही प्रयत्न करावेत शिक्षणबरोबरच नवीन तंत्रज्ञानही आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
श्री मगर म्हणाले कि, तरुणांनी प्रगती करताना शिका संघटित हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिस्त अंगी बाळगावी असे आवाहन केले
इतिहास संशोधक सावंत म्हणाले कि तरुणांनी मोडी लिपी शिकण्याची आवश्यकता आहे त्यामुळे इतिहासतील अनेक गोष्टी उजेडात येतील
श्री यादवराव म्हणाले, पर्यटन क्षेत्र विकसित केले तर तरुणांना चांगला रोजगार मिळेल
श्री कोंढरे यांनी प्रस्तविकात सांगितले कि मराठी समाजामध्ये साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली आहे
अभिषेक मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले युवराज दिसलें यांनी उपस्थिताचे आभार मानले.

See also  पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस