कात्रज कोंढवा रस्त्यावर त्रस्त नागरिकांनी लावले महानगरपालिकेच्या निषेधाचे बॅनर

कात्रज : गेले काही दिवस कात्रज कोंढवा रोडवर सातत्याने अपघात होत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत वारंवार दुरुस्तीची मागणी करून देखील पुणे महानगरपालिका प्रशासन याकडे सातत्या दुर्लक्ष करत आहे. तसेच काही दिवसापूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये येऊन गेले.

परंतु केंद्रीय मंत्री पुण्यामध्ये दाखल होऊन देखील महामार्गांवरील तसेच बाह्य वाळणांवरील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तर प्रशासन काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी रस्त्यावर करताना दिसत आहे. आत्तापर्यंत कात्रज कोंढवा रस्त्यावर 58 अपघातामध्ये 26 निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. तर अनेक जण गंभीर त्या जखमी झाले आहेत.

कात्रज कोंढवा रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर त्रस्त नागरिकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करणारे जाहीर फलक या रस्त्यांवर लावले असून महानगरपालिकेला अशा अपमान जनक फलकांनंतर तरी जाग येईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

कात्रज कोंढवा रस्त्यावरील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यात यावे तसेच रस्त्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी योग्य उपाय योजना तातडीने करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहे.

See also  बालेवाडी येथील अष्टविनायक मित्र मंडळाने सहकारी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती