अविरत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर थेरगावच्या रोहित कोतकर यांची एमपीएससी मधून सह्यायक राज्यकर आयुक्त पदाला गवसणी

आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून प्रशासकीय करिअर निवडले
पिंपरी चिंचवड : थेरगाव मधील आनंदवन सोसायटी येथे राहणारे रोहित बाळासाहेब कोतकर यांची  एमपीएससी मधून सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी, जीएसटी विभाग ,वर्ग -1 पदी निवड झालेली आहे. ताथवडे डेअरी फार्म येथे बालपण गेलेले आणि वडील अन्नसुरक्षा अधिकारी पदी कार्यरत असल्याने लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेकडे करियर म्हणून आकर्षित झालेल्या  प्रशासकीय सेवेचे बाळकडू घरापासूनच अनुभवत असल्याने आपणही प्रशासकीय अधिकारी म्हणून आपला ठसा उमटवावा अशी जिद्द मनाशी बाळगून रोहित बाळासाहेब कोतकर यांचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला.

रोहित यांनी शालेय शिक्षण वाकड येथील गुड सॅमारीटन स्कूल मधुन केले,त्यानंतर आकुर्डी येथील  डॉ डी वाय  पाटिल कॉलेज ऑफ इंजिनीरिंग  मधून अभियांत्रिकी च शिक्षण घेतले,हिंजवडी येथील बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये त्यांचे प्लेसमेंट झाले।आयटी कंपनीमध्ये मोठ्या पॅकेज ची नोकरी तसेच परदेशातील उच्च शिक्षणाची संधी असताना देखील मूळ प्रशासकीय सेवेची आवड ही त्यांना अस्वस्थ करत होती त्यामुळे रोहित ने खाजगी नोकरीचां राजीनामा देऊन यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरुवात केली. यूपीएससीच्या मुख्य परीक्षा देखील दिल्या सोबत एमपीएससी च्या परीक्षा सुद्धा देत होते परंतु यशाचा रस्ता थोडासा खडतर होता अंतिम यश हे थोड्या थोड्या गुणांनी हूलकावणी देत होते. अपयशाने ते खचले नाहीत. जिद्द मेहनत,संयम,चिकाटी शब्दकोशातील या सर्व शब्दांची  अनुभूती त्यांनी अनुभवली. यशाची गरुड भरारी त्यांचे कुटुंब आई,वडील,बहिण व मित्रपरिवार यांच्या पाठिंब्याने शेवटी सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर एमपीएससी मधून जीएसटी विभागात सहाय्यक आयुक्त राज्यकर गट-अ पदी त्यांची निवड झालेली आहे.

See also  ‘चला जाणूया नदीला’ अभियानात जिल्हा परिषदेचा सक्रीय सहभाग- मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण