“पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची कॉंग्रेस भवन येथे नियोजन बैठक संपन्न “

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने  शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या नियोजन संदर्भात शहर काँग्रेस चे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली.यानंतर दुपारी १ वाजता महाविकास प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली.

सदर बैठकीत निवडणुकीच्या नियोजन संदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.यावेळी विधानसभा निहाय निवडणूक कचेरी टाकते,शहरज्ञव विधानसभा निहाय समन्वय समिती तयार करणे.दि.२९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता इंडिया फ्रंट आघाडीतील घटक पक्षांसोबत बैठकीचे नियोजन करणे,पत्रकामधे कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा.महाविकास आघाडीचे विधानसभा निहाय निरिक्षक तसेच निवडणूकीच्या दृष्टीने विविध कमिट्या तयार करणे या विषयावर चर्चा करण्यात आली.याबैठकीत महाविकास आघाडीचे व मित्र प‌क्षाचे उमेदवार मा रविंद्र धंगेकर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचि निर्धार करण्यात आला.

या बैठकीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे,महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर,माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड.आभय छाजेड,कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अजित दरेकर,अमीर शेख, त्याचबरोबर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे) गजानन थरकुडे, संजय मोरे, कल्पना थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गटाचे) अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर आदींसह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

See also  येरवडा येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन