आप नेते खासदार संजय सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर

पुणे : आप नेते खासदार संजय सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्या बद्दल आम आदमी पार्टीच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला.

आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे प्रतिक्रिया देताना म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या तानाशही प्रवर्तीमुळे आप चे खासदार संजय सिंग यांना जेल मध्ये जावे लगाले होते. वास्तवात एक पैश्याचा सुधा भ्रष्टाचार झालेला नाही तरीही संजय सिंग यांना ६ महिन्यापासून जेल मध्ये ठेवले होते.मोदी आणि भाजप आम आदमी पार्टीच्या इमानदारी च्या राजकारणाला घाबरलेली आहे, २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पराभव समोर दिसत आहे.आम्ही भाजपा चा खरा चेहरा जनतेसमोर सातत्याने आणत राहू. “

See also  मराठा समाजातील तरुणांनी न्यूनगंड सोडावा आणि प्रगती करावी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण अडसूळ यांचे आवाहन