पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने वीज दर वाढीचा निषेध व्यक्त करत आंदोलन

पुणे : महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना महायुती सरकारने केलेली वीज दरवाढ म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सरकारच्या या अन्यायी वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालय, पॉवर हाऊस, रास्ता पेठ, पुणे येथे आंदोलन करण्यात आले व निवेदन दिले.

ऐन उन्हाळ्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांना हे सरकार अजून किती त्रास देणार आहे. महायुती सरकार सर्वसामान्य नागरीकांना गृहीत धरून त्यांच्यावर वीजदरवाढ लादली जात आहे, या गोष्टीचा जाहीर निषेध यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

यावेळी संसदरत्न खा.सुप्रिया सुळे, काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप, शिवसेनेचे श्री. अशोक हरणावळ, जेष्ठ नेते श्री.मोहन जोशी, श्री.अभय छाजेड, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, मुकुंद किर्दत, शेखर धावडे, विशाल धनावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य यंत्रणेकडील कामांचा आढावा