पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून उभारण्यात आली ‘न्यायाची गुढी’.‘‘न्याय कार्ड’’ घरोघरी पोच करणार – अरविंद शिंदे, अध्यक्ष-पु.श.काँ.क.

पुणे : पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून शेतकरी न्याय, महिला न्याय, युवा न्याय, भागीदारी न्याय आणि श्रमिक न्यायाची गुढी आज महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे उभारण्यात आली.   

यावेळी महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे निवडणुकीचे सन्मवयक अरविंद शिंदे, काँग्रेस नेते अभय छाजेड,  अजित दरेकर,  अशुतोष शिंदे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की, ‘‘मी सध्या सर्वांना भेटतोय सर्वांशी चर्चा करतोय. येणारा काळ इंडिया आघाडीचा आणि काँग्रेसचा असणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन काम करणे आणि आपण केलेले काम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

    शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढवायचा असून कशाप्रकारे प्रचार करायचा त्याची व्युहरचना कशी असावी, जाहिरनाम्यात या पाच न्याय गोष्टींचा समावेश असावा, यासारख्या मुद्दयांवर बैठक होणार आहे. तसेच न्याय कार्ड प्रत्येकाच्या घरी पोच केले जाणार असून त्यावेळी न्यायचे मुद्दे समजून सांगितले जाणार आहेत.’’

    पुण्यात राष्ट्रसेवादलाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असून, तसे पत्र त्यांनी दिले आहे. त्यांच्याकडूनही पथनाट्य माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे.

यावेळी ॲड. अभय छाजेड यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

See also  सोशल मीडियावर पत्र लिहिणे ही देवेंद्र फडणवीस यांची केवील वाणी नौटंकी - आम आदमी पार्टी