सिग्नल पडू नये म्हणून दोरीने बांधला

हडपसर : वाहतूक नियंत्रणासाठी वापरला जाणारा सिग्नल पडू नये म्हणून दोरीने नियंत्रित करावा लागत असून पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला दोरीचा आधार अशी काही परिस्थिती हडपसर परिसरातील आयबीएम कंपनी समोर पाहायला मिळत आहे.

आयबीएम कंपनी समोर रस्त्याच्या मधोमध असलेला सिग्नल का बाजूला झुकला असून हा सिग्नल पडू नये म्हणून तात्पुरता दोरीने बांधून ठेवला आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या रहदारीच्या रस्त्यावर सिग्नल पडण्याची शक्यता असं यामुळे गंभीर स्वरूपाचा अपघात होऊ शकतो म्हणून हा सिग्नल तातडीने काढण्यात यावा अशी मागणी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी केले आहे.

सिग्नल ची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अथवा सिग्नलचा खांब बदलण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

See also  काँग्रेस ज्याच्या गळयात पडते त्याचे बुडणे निश्चित; केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची टीकाउद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी बुडणारसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन