होर्डिंगची उंची व रुंदी याचे ऑडिट करण्यासाठी शासनास निर्देश द्यावे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा लक्षवेधी चर्चेत सहभाग ; महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन

मुंबई/ पुणे  :  शासनाच्या नियमावलीनुसार होर्डिंगची उंची व रुंदी स्पष्ट देऊन सुद्धा काही शासकीय अधिकारी व होर्डिंग मालक यांच्या भागीदारीमुळे ही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे होर्डिंग दुर्घटनेबाबतच्या वाढत्या दुर्घटना रोखण्याकरिता शासनाने होर्डिंग बाबत केलेल्या नियमावलीचे पालन योग्यरित्या करण्यासाठी व त्याचे ऑडीट करण्यासाठी शासनास निर्देश देण्याची मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभा पावसाळी अधिवेशनात केली.

मुंबई येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनात होर्डिंग अपघात बाबत मांडलेल्या लक्षवेधी चर्चेत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सोमवारी दुपारी सहभाग घेतला. घाटकोपर येथील अनधिकृत होर्डिंग पडल्यानंतर झालेल्या दुर्घटनेबाबत लक्षवेधी मांडण्यात आली होती.

होर्डिंग बाबत शासनाची जी नियमावली आहे, ती योग्यरीत्या राबविण्यात येत नसल्यामुळे व त्या नियमावलीचे योग्यरीत्या पालन न केल्यामुळे बरेच अपघात होत आहेत. घाटकोपर, पुणे यांसह महाराष्ट्राच्या विविध भागात होर्डिंगचे अपघात झाल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे शिरोळे यांनी याबाबत मागणी केली आहे.

See also  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भुजबळ टाउनशिप, एकलव्य चौक, कोथरूड येथील सोसायट्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश