सीए दिवसानिमित्त ‘आयसीएआय’तर्फे विविध उपक्रम

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा व ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेच्या संयुक्त विद्यमाने सीए डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे ध्वजारोहण करून कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर तळजाई येथे वृक्षारोपण, विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आले. विद्यार्थी व सीए सभासदांसाठी रांगोळी, फोटोग्राफी, चित्रकला, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या.

‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे आयसीएआयच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हे सर्व कार्यक्रम झाले. ‘आयसीएआय’च्या विभागीय समितीचे सदस्य सीए यशवंत कासार, उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए ऋषिकेश बडवे, ‘विकासा’ चेअरमन सीए प्रणव आपटे, खजिनदार सीए मोशमी शहा, कार्यकारिणी सदस्य सीए काशिनाथ पठारे, सीए राजेश अग्रवाल, सीए प्रितेश मुनोत, सीए अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.

बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनसह बिगबक्स फायनान्सियल सर्व्हिसेस (प्रभात रोड), राठी अँड राठी कंपनी (सिंहगड रोड), फुलपगार लोढा अँड कंपनी (शंकर शेठ रोड), हवेली युथ फाउंडेशन (अमनोरा पार्क), डीएएसके अँड असोसिएट्स (स्वारगेट), गुगळे अँड असोसिएट्स (शंकर शेठ रोड), इंटरलिंक कॅपिटल अडवायझर्स (धनकवडी), प्रेस्टिज पॉईंट (शुक्रवार पेठ), एसपीसीएम (मित्र मंडळ चौक), एसपीएवाय अँड कंपनी (कर्वेनगर) आदी ठिकाणी हे रक्तदान शिबीर झाले.

सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “सीए डे आणि आयसीएआयच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सर्वच उपक्रमांत सीए सभासद व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. साखळीपीर तालीम व राष्ट्रीय मारुती मंदिर येथे वारकऱ्यांची सेवा व फराळाचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे तळजाई पठार येथे वृक्षारोपण झाले. आयसीएआय भवनसह प्रेस्टिज पॉईंट व अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. क्रीडा व कला स्पर्धांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. आर्थिक साक्षरता उपक्रमांतर्गत स्वारगेट ते हडपसर ‘सीए दिंडी’ काढण्यात आली. वारकऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता करण्याचा यामागे उद्देश होता.”

See also  मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे आप यांची मागणी