बाणेर शिंदे पारखे मळा येथील लोकवस्तीतील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्यात यावी मनसेची मागणी

बाणेर : बाणेर भागातील सावरकर गार्डन व मित्रांगण सोसायटी समोरील शिंदे-पारखे मळा येथे ५०० लोकवस्तीच्या ठिकाणी १५ ते २० दिवस झाले ड्रेनेज लाईन तुंबून त्याचे मैलापाणी तेथील रहिवाश्यांच्या घरामध्ये शिरत आहे. वारंवार ड्रेनेज तुंबून मैलापाणी घरात येत असल्याने त्याची दुर्गंधी परिसरामध्ये पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे ड्रेनेज वारंवार तुंबल्याने वस्तीमध्ये मैलापाणी तुंबून राहते. त्यामुळे वस्तीमध्ये शेवाळ होऊन रस्ता निसरडा झाला आहे. शेवाळ झाल्यामुळे अनेक नागरिक, महिला घसरून पडले आहेत. खोलगट भागात पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, रहिवाश्यांना व नागरिकांना सदर ठिकाणाहून चालणेही कसरतीचे झाले आहे. या परिसरांमध्ये डासांचा मोठ्या प्रमाणात वावर व उत्पत्ती वाढत आहे व त्याचा त्रास तेथे राहणाऱ्या रहिवाश्यांना होत आहे. यामुळे थंडी, ताप, खोकला, व अंगदुखीमुळे आजारी आहेत. या लोकवस्तीमध्ये २५ घरामागे एक डेंग्यू सदृश रुग्ण आढळून येत आहेत. तर काही नागरिक डेंग्यू, स्वाईनफ्लू, व झिका सारख्या आजाराला बळी पडण्याची शक्यता आहे   
तेथील रहिवाशी मारुती बनकर यांनी ऑनलाईन अर्ज करून व क्षेत्रीय कार्यालयात अनेक वेळा सांगूनही याकडे संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देत नाही व दुरुस्तीही करत नसल्याने या परिसरातील अनेक नागरिकांनी या सर्व गोष्टीला कंटाळून आमच्या कार्यालयात येऊन तक्रारी देत आहेत.
तरी आपणास विनंती कि नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता हे ड्रेनेज संबंधितांकडून त्वरित दुरुस्त करून घ्यावे. अशी मागणी मनसे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी केली आहे. आयुक्त, महापलिका भवन, शिवाजीनगर, पुणे व महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय, औंध, पुणे यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष सुहास निम्हण, शाखाध्यक्ष मिलन भोरडे व मनसैनिक उपस्थित होते.
                                                     
                                                           )

See also  लोकन्यायालयाद्वारे प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात सलग दहाव्यांदा प्रथम स्थानी