बाणेर : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मध्ये पंढरपूर कडे जात असताना उरुळी कांचन येथे औंध बाणेर बालेवाडी व्यापारी संघटने कडून खाद्यपदार्थ व पाणी वाटप करण्यात आले. ही सेवा गेल्या पंधरा वर्षापासून व्यापारी संघटना करत आहे.
खाद्यपदार्थ(राजगिरा वडी शेंगदाणा लाडू उपासाचा चिवडा. त्याचबरोबर बिस्किटे ) व 900 बॉक्स पाणी आलेल्या सर्व दिंड्यांना व दिंडी सोबत चालणाऱ्या भक्तांना वाटप करण्यात आले.
यावेळी प्रकाश तापकीर, भवरलाल चौधरी, पन्ना राम काग, वरदाराम भायल, जेठाराम गेलोत, दलपत सोयल आदी उपस्थित होते.
























