बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन

बालेवाडी : बालेवाडी येथे पाण्याच्या टाकी जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद  पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष संदीप धारू बालवडकर यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आठवड्या बाजाराचे उद्घाटन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर, राजेश बालवडकर, पुणे शहर युवती अध्यक्ष सुषमा सतपुते, स्वप्नील बालवडकर, मंगेश कांबळे, संकेत बालवडकर, दत्ता बालवडकर, महेश फरगडे आदी उपस्थित होते.

फरगडे फार्मर्स इंडिया प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून विकेल ते विकेल या अभियाना अंतर्गत हा आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे. बालेवाडी परिसरातील नागरिकांना स्वस्त दरात ताजा भाजीपाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

See also  ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणालीबाबतराज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि स्टेट बँकेदरम्यान करारनामा