आम आदमी रिक्षा आणि इतर वाहतूक संघटना (महाराष्ट्र राज्य ) प्रथम स्नेहमेळावा

पुणे : आम आदमी रिक्षा आणि इतर वाहतूक संघटना (महाराष्ट्र राज्य ) प्रथम स्नेहमेळावा साने गुरुजी सभागृह, राष्ट्र सेवा दल, पुणे शहर या ठिकाणी  संपन्न झाला.

कष्टकरी कामगार, रिक्षा चालक सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष श्री अजित फाटके पाटील साहेब यांनी खूप मोठी घोषणा केली. “रिक्षा चालकांना शहरात कुटुंब चालवण्यासाठी अनेक आर्थिक अडचणी येतात, दिवसभर राब राब राबून मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा आणि घरभाडे यामध्ये खूप खर्च होतो. म्हणून आप महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर सर्व रिक्षासाठी नोंदणी आणि इन्शुरन्स चा खर्च सरकार करेल अशी घोषणा केली.”

पुणे शहरात आप ची सत्ता आल्यावर सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण, आरोग्य सेवा लागणारा सर्व खर्च पुणे महानगरपालिका करणार. महापालिकेचे वार्षिक 11600 कोटी रुपये बजेट हे पारदर्शक आणि नियोजनबध्द पद्धतीने पुणेकरांसाठी वापरू. तसेच सत्तेच येण्याअगोदर ही महापालिकेच्या सर्व सामाज विकास विभागाच्या योजनांचा लाभ रिक्षा चालकांच्या कुटुंबाला मिळवून देण्याची घोषणा श्री  सुदर्शन जगदाळे, पुणे शहराध्यक्ष यांनी केली.

रिक्षा चालक यांच्या न्यायासाठी कोणी लढत नाही, आम आदमी रिक्षा आणि इतर वाहतूक संघटनाच्या माध्यमातून आम्ही रिक्षा चालक यांना खऱ्या अर्थाने न्याय देऊ. संघटन मंत्री श्री एकनाथ ढोले यांनी आश्वासन दिले.

पुणे शहरात कट्टर आणि एक जीवाने काम करणाऱ्यांची मोठी फौज जमा करणार आहे. रिक्षाचालक, कामगार आणि कष्टर्यांचा हा देश आहे त्यांना न्याय मिळवून देईल असे आश्वासन  रिक्षा संघटना सल्लागार श्री प्रभाकर कोंढाळकर यांनी दिले.
येऊ घातलेल्या काळात किमान 2000 रिक्षा चालकांचा मेळावा घेण्याचे नियोजले आहे.

या वेळी प्रवक्ते श्री मुकुंद किर्दत,श्री संदेश दिवेकर, रिक्षा संघटना अध्यक्ष कानिफनाथ घोरफडे, महिला आघाडी अध्यक्ष सुरेखताई भोसले,श्रमिक संघटनेचे अध्यक्ष मनोज थोरात  यांनी मनोगत व्यक्त केले.
श्री किरण कांबळे यांनी आभार मानले तसेच समीर अरवडे यांनी सूत्रसंचालन केले.

उपस्थित श्री धनंजय बेनकर, असगर बेग, उमेश बागडे, जिब्रिल शेख, सतीश यादव, सतीश यादव, अनिल कोंढाळकर, गुणाजी मोरे, गणेश थरकुडे आणि इतर.

See also  ‘सुपर सनी विक’ पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल स्पर्धेत धुलदेव घागरे, अर्चना आढाव, नागेश कारंडे, राणी मुलचंदानी यांना विजेतेपद