पुणे महानगरपालिकेमार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत  नदी स्वच्छता मोहिमेचे आयोजन

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सन २०२४ च्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेमार्फत दि. २२ एप्रिल २०२४ ते २८ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये स्वच्छता अभियान सिंगल युज प्लास्टिक बंदी अंमलबजावणी बाबत जनजागृती व कारवाई, ई-कचरा संकलन मोहीम अशा विविध स्वच्छता विषयक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.


त्या अनुषंगाने दिनांक २६/०४/२०२४ रोजी स.०७.०० ते ९.०० या वेळेत भिडे पूल नदीकाठ परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या नदी स्वच्छता अभियानामध्ये श्री.पृथ्वीराज बी.पी. मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), पुणे महानगरपालिका, श्री.संदीप कदम, मा.उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, श्री.माधव जगताप, उपायुक्त, पर्यावरण विभाग, डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन, श्री.रवी खंदारे, महापालिका सहाय्यक आयुक्त, शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय,श्री.मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे महानगरपालिका, ब्रॅन्ड अॅम्बॅसीडर श्रीमती रुपाली मगर, श्री.विक्रांत सिंग, आम्रपाली चव्हाण, श्री.इमामुद्दिन इनामदार, प्रमुख आरोग्य निरीक्षक, व इतर अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. तसेच सदर नदी स्वच्छता अभियानामध्ये मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांनी देखील आपला सहभाग नोंदविला.


एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, कै.बंडोजी खंडोजी चव्हाण महाविद्यालय, कावेरी इंटरनॅशनल स्कूल, हिराभाई व्ही. देसाई कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स अशा विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, आदर पूनावाला क्लिनसिटी इनिशिएटिव्ह या संस्थांचे प्रतिनिधी तसेच शिवाजीनगर-घोलेरोड व कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी या नदी स्वच्छता अभियानामध्ये सक्रीय सहभाग घेतला.
या अभियानामध्ये पर्यावरणपूरक, जागतिक तापमानवाढ संबंधीत व स्वच्छता विषयक गीत सादर करण्यात आले. मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व पर्यावरणपूरक सवयी जोपासण्याविषयी आवाहन केले. सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने जनजागृती करून उपस्थित प्रत्येक सहभागींना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व सहभागींनी माझी वसुंधरा व मतदार जागृती शपथ घेतली व सदरील कार्यक्रम संपन्न झाला.सदर नदी स्वच्छता अभियानामध्ये एकूण २५० सहभागींनी आपला सहभाग नोंदविला व एकूण ३७० किलो सुका कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

See also  मराठा समाजातील तरुणांनी न्यूनगंड सोडावा आणि प्रगती करावी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण अडसूळ यांचे आवाहन