आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नातून सुसगाव परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात

सुस : आमदार शंकर मांडेकर यांच्या मागणीनुसार सुसगाव येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महामार्ग ते सनी वर्ल्ड पर्यंतचा सुसगाव हद्दीतील रस्ता रुंदीकरण करण्यासंदर्भात आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेत पत्राद्वारे मागणी केली होती.

यावेळी सुसगाव येथील वाहतूक कोंडी व सातत्याने होत असलेले अपघात याबाबत उपाययोजना करण्यात याव्या. तसेच या परिसरामध्ये शाळा महाविद्यालय तसेच हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणात आहेत यामुळे विद्यार्थी तसेच रुग्णवाहिकांना देखील रस्ता अरुंद असल्यामुळे याचा त्रास सहन करावा लागतो ही बाब मांडेकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती.

वाहतूक कोंडी व अपघात समस्या सोडवण्यासाठी या परिसरातील रस्ता रूंदीकरण करण्यात यावे तसेच खिंडीमधील चढ असलेल्या रस्त्याचे उतार कमी करण्यात यावे अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली होती यानुसार रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होणार आहे.

See also  विद्यापीठ वसतिगृहात प्रवेशासाठी नियामावली कार्यान्वित – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील