कार्यसम्राट मोफत महा-आरोग्य शिबीराच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात

पुणे, ता.२९: दिवंगत कार्यसम्राट आमदार विनायकजी निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त पुण्यातील सुप्रसिध्द ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ तर्फे आयोजित ‘कार्यसम्राट मोफत महा-आरोग्य शिबीर’ २२ जुलै पासून सुरू करण्यात आले. या शिबीराचा पहिला टप्पा पार पडला असून दूसऱ्या टप्प्याला सोमवार (ता.२९) जुलै पासून सुरवात झाली. शिवाजीनगरपासून पाषाण, सोमेश्नरवाडीपर्यंत ३६ ठिकाणी आरोग्य केंद्र उभे करण्यात आले आहेत. या आरोग्य केंद्रात पूर्व तपासणी, प्रथमिक उपचार, इसीजी, रक्त, लघवी तपासणी, सोनोग्राफी, एक्स रे, टूडी इको, तणाव तपासणी व मुख्य शिबीराची नोंदणी केली जात आहे. तपासणी पासून- शस्रक्रियेपर्यत एकाच ठिकाणी सर्वकाही सोय असल्याने परिसरातील बहुसंख्य गरजू नागरिक शिबीराचा लाभ घेताना दिसून येत आहेत. 

या विविध ठिकाणी उभे करण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचे उदघाटन माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे,  माजी नगरसेवक आदित्य माळवे , राजश्री काळे, सामाजिक कार्यकत्या मंगला पाटील, सुनील शिरोळे, शैलेश बडदे, इक्बाल शेख, अनिल बहिरट, सतिश चव्हाण, अतुल बहिरट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शंकर चव्हण, अमित मुरकुटे, सचिन मानवतकर, सचिन इंगळे, अनिकेत कपोते, टिंकू दास, देवेंद्र देवकर, संतोष ओरसे, अभिषेक परदेशी, प्रमोद कांबळे, गणेश शेलार, गणेश शिंदे, ऋषीकेश मारणे, कृष्णा पटेल, बाळासाहेब सोरटे, कैलास पवार, कपिल शिंदे आदी कार्यकर्ते शिबीराचे संयोजन करत आहेत.

शिबीराचे वैशिष्टे –
विनामुल्य आरोग्य शिबीरात सर्व पॅथींचा समावेश.
ॲलोपॅथी, आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, युनानी), दंतचिकीत्सा इत्यादी तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषधी विनामुल्य उपलब्ध
देशातील नामवंत तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती.
डॉ.तात्यासाहेब लहाने, डॉ.वाकणकर, डॉ.गौतम भंसाळी, डॉ.रमाकांत देशपांडे, डॉ.के.एच संचेती, डॉ.विकास महात्मे, डॉ.यशराज पाटील, डॉ.अजय चंदनवाले, डॉ.संजयकुमार तांबे, डॉ.जगन्नाथ दिक्षीत, डॉ.अमित मायदेव, डॉ.अजय चौरसिया इत्यादी…..
विविध आजारांवरील उपचार
एकुण 80 बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश
सदरील बाह्यरुग्ण कक्षांत आयुष, नेत्रचिकीत्सा, दंतचिकीत्सा, कान नाक घसा, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, हृदयरोग, श्वसनविकार, मुत्ररोग, प्लॉस्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, अनुंवशीक विकार, कर्करोग, लठ्ठपणा, वृध्द जनरल तपासणी, मतीमंद रुग्ण तपासणी, मनोविकार, मेंदुरोग इत्यादी आजांरावर विनामुल्य औषधोपचार व शस्त्रक्रिया
त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आवश्यक रक्त व लघवी चाचणी नमुणे संकलन, तसेच इ.सी.जी, मॅमोग्राफी, पी.एफ.टी., बी.एम.डी. तपासणी

गरजु रुग्णांना मोफत वितरण
कृत्रिम अवयव, चष्मे, वृध्दकाठी, अंधकाठी, दिव्यांग साहित्य, कर्णयंत्र, दातांच्या कवळया यांचे नोंदणीनुसार वाटप
आपतकालीन व्यवस्थेमध्ये कार्डीयाक रुग्णवाहीका, रुग्णवाहीका, अग्निशमन वाहन, रुग्ण स्ट्रेचर, व्हिलचेअर यांचा समावेश
सर्व रुग्ण व रुग्णनातेवाईक यांना मोफत अल्पोपहार व भोजनाची सोय.
          सर्व नागरीकांनी या बहुमुल्य संधीचा लाभ घ्यावा असे आयोजक सोमेश्वर फॉऊंउेशन, पुणे तसेच निमंत्रक माजी नगरसेवक मा.श्री.सनी विनायक निम्हण यांनी आवाहान केले आहे. गरजू नागरिकांनी आधिक माहितीसाठी 8308123555 या नंबरवर संपर्क करावा.

See also  डीआयएमआर कडून छत्रपती शिवरायांना मानवंदना