क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा महाराष्ट्र सदन सावरकर जयंती निमित्त पुतळा हटविण्यात आल्या प्रकरणी कार्यवाहीची मागणी

पुणे : दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे,त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे.

या घडलेल्या प्रकाराची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मागणी.

See also  औंध क्षेत्रीय कार्यालयाकडून नववर्षाच्या स्वागतासाठी घाणीच्या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी