पुणे : बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी टाटा मेट्रो कार्यालयात अधिकाऱ्यांचे भेट घेऊन वाहतूक समस्या सोडवण्यासाठी धारेवर धरत नियोजन करण्याची मागणी केली.
टाटा मेट्रो कंपनीने हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो साठी 200 हून अधिक ट्राफिक वॉर्डन देणे आवश्यक आहे परंतु हे वॉर्डन जागेवर थांबत नसल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. ही बाब अमोल बालवडकर यांनी टाटा मेट्रोच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली.
बाणेर बालेवाडी परिसरामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. तसेच रस्त्यांची दुरावस्था देखील झाली आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी समस्या बिकट होत आहे. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी समस्या निर्माण होत आहे त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे तसेच रस्त्यांमधील खड्डे बुजवण्यात यावे. तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी अमोल बालवडकर यांनी केली. याबाबत पुणे शहर वाहतूक आयुक्त मनोज पाटील यांना देखील निवेदन देण्यात आले.
बाणेर बालेवाडी परिसरामध्ये अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन च्या वतीने दहा ते पंधरा वार्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु वाहतूक समस्या अधिक असल्याने या परिसरामध्ये अधिक वॉर्डनची आवश्यकता आहे. पुणे महानगरपालिका मेट्रो व वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून या परिसरामध्ये अजून 50 गुण अधिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली.