पाषाण रोडवरील पथदिवे दुरुस्त करावेत व खड्डे दुरुस्त करण्यासंदर्भात मनसेचे निवेदन

पाषाण : पाषाण रोड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते पाषाण गाव (डॉ होमी भाभा रोड) या मुख्य रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसापासून बंद अवस्थेत आहे. पथदिवे बंद असल्यामुळे नागरिक संध्याकाळच्या वेळी बाहेर येण्यासही धजावत आहेत. रस्त्यावर सर्वत्र अंधार पसरल्यामुळे गैरप्रकार होण्याची शक्यता बळावते, चोरीचे, छेडछाडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाषाण रोड परिसरात मोठी नागरी वस्ती असल्यामुळे व हा रस्ता पुढे मुंबई-बेंगलोर महामार्गाला मिळत असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मॉर्डन शाळेच्या प्रवेशद्वारासमोर, लॉयला शाळेच्या प्रवेशद्वारासमोर, व पोलीस रिक्रिएशन पेट्रोल पंपासमोर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच पादचारी मार्गाला लागून पथदिव्याचा खांब डांबरी रोडवर अनेक महिने झाले ठेवले आहे. त्यामुळे आम्हास असे वाटतंय कि रस्त्यावर पथदिवे ठेवण्याची  स्मार्ट सिटीची नवीन कल्पना आहे का काय ते समजत नाही.


मेट्रोने पोलीस रिक्रिएशन पेट्रोल पंपासमोर मोठे मोठे सामान ठेवल्यामुळे रस्ता अतिशय चिंचोळा झाला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे खड्डे भरलेले असल्याने खड्यांमध्ये घासून व आदळून अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. गेल्या आठवड्यात या रस्त्यावर अनेक ठिकाणी अनेक वेळा छोटे मोठे अपघात झाले आहे. पादचाऱ्यास व वाहनचालकास अंधारामुळे खड्डा दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संध्याकाळी बाहेर पडण्याचा अनेक नागरिकांनी धसकाच घेतला आहे. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिक या प्रकाराला वैतागले आहेत.
ह्या व अश्या अनेक प्रकारच्या कारणांमुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला, फळविक्रेते आमच्या कार्यालयात येऊन तक्रार करत आहेत. तरी वरील सर्व अनर्थ टाळण्यासाठी आपण कृपया येत्या २ दिवसात पथदिवे दुरुस्त करावेत व संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत करावा म्हणून हे निवेदन देत आहोत.
येत्या २ दिवसात  पथदिवे व रस्त्यावरील खड्डे दुरुस्त केले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल.  होणाऱ्या नुकसानीस व सदर ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास आपणास जबाबदार धरले जाईल. याची कृपया आपण नोंद घ्यावी अशाप्रकारचे निवेदन  महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, व महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय, औंध यांना  निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, उपविभाग अध्यक्ष पांडुरंग सुतार, प्रभाग सचिव संदीप काळे, व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  अनुसूचित जाती, जमाती, मराठा आणि ओबीसींसाठी असणाऱ्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रात असणे आवश्यक-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील