वामा वुमेन्स क्लब व लायन्स क्लबच्या वतीने महिलांसाठी कॅन्सर स्क्रिनिंग शिबिर आयोजन

बाणेर : बाणेर येथे वामा वुमेन्स क्लब व लायन्स क्लबच्या वतीने महिलांसाठी कॅन्सर स्क्रिनिंग शिबिर आयोजित करण्यात आले होते.

भारतात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो तो स्तनांचा कॅन्सर. भारतात गेल्या 20 वर्षांत स्तनांच्या कॅन्सरने ग्रस्त महिलांची संख्या वाढतेय. त्यासाठी सर्वच पातळीवर जनजागृती होणे महत्वाचे आहे, म्हणूनच वामा वुमेन्स क्लब च्या अध्यक्षा पूनम विशाल विधाते,मा. गंधाली देसाई, लायन्स क्लब ऑफ पुणे अशोकनगर व वामा वूमेन्स क्लब यांच्या पुढाकाराने ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन डॅा तेज्वसिनी भाले यांच्या प्रकृती आयुर्वेदा पंचकर्म क्लीनिक मध्ये करण्यात आले होते. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली. महिला स्वतःच्या आरोग्यासाठी पुढे येत आहेत हि समाधानाची बाब आहे असे पुनम विधाते यांनी सांगितले.

See also  साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिवादन