सिंहगडावर स्वातंत्र्य दिनानिमित्त  शासकीय  ध्वजारोहण

खडकवासला : जिल्ह्यातील सर्वांत उंचावरील ऐतिहासिक किल्ले सिंहगडावर स्वातंत्र्य दिनानिमित्त  शासकीय  ध्वजारोहण गुरूवारी  करण्यात आले. खडकवासला येथील महसूल विभागाचे मंडल अधिकारी हिंदुराव पोळ  यांच्या  हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी वनविभागाचे अधिकारी, ग्रामीण पोलीस, पत्रकार आणि ग्रामस्थांनी ध्वजास मानवंदना दिली.  जमिनीवर या ध्वजाची उंची ७६० मिटर तर समुद्र सपाटीपासूनची १३१२ मिटर उंची आहे.

   गडावरील बालेकिल्ल्यावर श्रीकोंढणेश्वर मंदिराजवळ हा ध्वजस्तंभ आहे. येथे फडकविलेल्या झेंड्याचा आकार २१ बाय १४ फूट आहे. यावेळी घेरा सिंहगडचे तलाठी गौतम देवघडे, खानापूर आणि धायरीचे मंडल अधिकारी गौतम डेरे, अर्चना डेंबरे, खडकवासल्याचे तलाठी रवी फणसे, पोलीस कर्मचारी अजय पाटसकर , पंचचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर, माजी सरपंच अमोल पढेर, दत्ता जोरकर, गणेश गोफणे, वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनसक्षक बळीराम वाईकर, ऋषिकेश लाड, पत्रकार संदीप वाडेकर, शिवालिका संस्थेचे अध्यक्ष माऊली कोडीतकर, पुरातत्व विभागाचे सागर शिंदे, पोलीस पाटील निलेश चव्हाण, कोतवाल ओम शिर्के,  संदीप कोळी,  स्वप्निल सांबरे, सुरक्षारक्षक नितीन गोळे, राम डिंबळे, रोहिणी डिंबळे,  विठ्ठल पढेर, उत्तम खामकर आदी  यावेळी उपस्थित होते. 

गडावर २६ जानेवारी, 1 मे व 15 ऑगस्ट रोजी येथे शासकीय ध्वजारोहण होते. जिल्ह्यातील एवढ्या उंचीवरील हा सर्वात मोठा ध्वज आहे असा दावा पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर आणि वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी केला.

 

 

See also  सिद्धार्थ शिरोळे यांना औंध भागातील युवकांचा वाढता पाठिंबा, विविध मंडळातील कार्यकर्त्यांशी,  नागरिकांशी प्रत्यक्ष भेटी